Sunday, February 2, 2014

99. Punishment to Dacoits and surge of humanity in face of calamity!



Thousand Moon: Madhukar Sadashiv Pethe
Contributed By: Prasanna Pethe
Translation: Rohini   
                                                                    
Shri Madhukar Sadashiv Pethe (81+) lives a retired life in Borivali, Mumbai. He was the principal of Paranjape School (Andheri) since the school’s founding.
Here I give the summary of the two intriguing memories from his past. The first, when he witnessed the hanging of some dacoits who had robbed his family at the limestone mines near Porbandar. The second, when his school’s field trip was caught up in a tornado. I have attached the original writing in Marathi for the reading pleasure of those who know the language.
Memory 1:
In the late 1940’s we used to visit my parents in Porbandar. This must be around 1946. Near Ranavan station there is an opulence of limestone mines with carved out openings for light and ventilation. There was a residence of a Saadhu in the long tunnels, where the rock and sand had been totally hollowed out.  Elaborate ritualistic decoration complete with wooden housing for idols, chanting and offerings were everywhere. Any visitors to the mines would also stop by for ‘Darshan’ and ‘Prasad’. I was 14 years old then. I was wandering through this tunnel looking around. This was supposed to be cave of Jambuvanti, Krishna’s wife, the bear princess. It was believed that the cave was internally connected all the way to Dwaraka. Many related stories related to the lord of Dwaraka spread in this region. Suddenly I saw a glimpse of a rugged face peering down through one of the carved out ventilation wholes. I saw bloodshot unslept eyes. In the meantime the Sadhu Maharaj had returned. He rang a bell and our group received the Prasad and left the tunnel. At the exit we were surrounded by a gang of 8-10 bandits. They robbed us of all our money leaving 3 ‘anas’ each for our return journey. Women were forced to give up their jewelry. They even took rings from men’s fingers and gold and silver buttons from our ‘kurtas’. There definitely was a connection between what had happened, between the face I had seen and the bell that the Baba had rung. We were grateful to have left the place alive.
Later on, Four dacoits from that gang were publically hanged outside of the Porbandar jail for several crimes including some murders. I was one amongst many who watched. This all happened within two years from when we were robbed. Could this happen in today’s India?
Memory 2:
Here Principal Pethe narrates the incredible tornado that his school’s field trip experienced in 1975 in a town called Jamakhambalia in Sourashtra. He recounts the courage exhibited by his staff in seeing the young children to safety. He expresses his gratitude to the local families and merchants for lending a helping hand to his team and taking care of them despite their own loss and suffering. He says although the children witnessed devastation and nature’s fury they also witnessed fraternity between the two neighboring states of Gujrat and Maharashtra. He is glad for the small fund that his school was able to raise for the elementary school in Jamakhambalia that was destroyed in the tornado.

Original write-up in Marathi….

आठवण: १
पोरबंदर येथे १९४२ ते १९५२ या काळात दिवाळी, नाताळ  उन्हाळी सुटीत आई वडिलांकडे आम्ही जात असू. ही गोष्ट १९४६ मधली असावी. पोरबंदर जवळच्या राणावाव स्टेशनजवळ चुनखडीच्या दगडाच्या खाणी विपुल आहेत.  प्रकाशासाठी व हवेसाठी झरोके.  आतून संपूर्ण मोकळी झालेली दगड माती संपूर्ण काढलेल्या भुयारवजा जागा. आत एका साधूचे वास्तव्य. देव, देव्हारे, पूजाअर्चा असं साग्रसंगीत चालू असायचं. भुयाराला भेट देणारे दर्शन, प्रसादाला येऊन जायचे.  दक्षिणा ठेवायचे. तिथे एक भेट प्रतिवर्षी असायचीच. १९४६. मी चौदा वर्षांचा असेन. त्या दिवशी साधू महाराज नव्हते. मी इकडेतिकडे भटकत असताना वरच्या झरोक्याशी एक वाकून पाहणारा चेहरा, तांबारलेले डोळे दिसले. थोड्यावेळाने तो साधू आला. त्याने घंटी वाजवली..... आरती झाली. प्रसाद घेऊन आम्ही भुयाराबाहेर आलो. एक सांगायचं म्हणजे भुयारातली माती सोन्याच्या कणांसारखी चकाकते. हे भुयार जाम्बुवंतीचे भुयार म्हणून विख्यात आहे. आतून म्हणे ते द्वारकेपर्यंत जोडलेले आहे. \कृष्णाची पत्नी जाम्बुवंती. ती अस्वल राजकन्या होती. तिचा भाऊ जांबुवंत. स्यमंतक मण्यासाठी इथे कृष्णाबरोबर त्याचं मल्लयुद्ध झालं अशा अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. द्वारका, मूळ द्वारका, प्रभासपाटण, प्राची, ओखा( उषामंडल - उषा - कृष्णाची नातसून अनिरुद्धाची पत्नी) असा हा सर्व द्वाराकाधिशाच्या जीवनाशी संबंधित परिसर. 
आम्ही भुयाराबाहेर आलो आणि आठ सशस्त्र बहारवटीयांनी-ठगांनी आम्हाला घेरले. माझे वडील पोरबंदरच्या महाराणा मिलमध्ये "प्रिंटींग मास्टर" होते. आमच्या कुटुंबासमवेत त्यांच्या मिलमधल्या सहकाऱ्यांची काही कुटुंबे व आमच्याकडची काही नातेवाईक मंडळी होती. त्या साधूने वाजवलेली घंटी, मला दिसलेले डोळे आणि चेहरा, आणि हे बहारवटीयांनी आम्हाला घेरणे यांचा निश्चितच संबंध होता.  
त्या दरोडेखोर ठगांनी आम्हा प्रत्येकाला प्रवासासाठी फक्त तीन तीन आणे ठेवून सर्व रक्कम, स्त्रियांचे अंगावरील दागदागिने, पुरुषांच्या बोटातील अंगठ्या, सोन्याचांदीची बटणे इत्यादी सर्व काढून घेतले. आम्ही जीवानिशी सुटलो. पण हे नाट्य जवळजवळ तास दीडतास चालू होते.
अनेक गुन्ह्यांखाली आणि काही खुनांसाठी या बहिरवटीयांच्या टोळीतील चार बहिरवटीयांना पोरबंदरच्या तुरुंगाच्या भिंतीवर हजारो नागरिकांसमक्ष फासावर लटकावलेले पाहणाऱ्यांच्या गर्दीत मी सुद्धा होतो. ही घटना अवघ्या दोन वर्षानंतरची.
असं आजच्या भारतात घडू शकेल?  
आठवण: २
ही आठवण सौराष्ट्रातलीच आहे. १९७५ मधली. परांजपे विद्यालयाची गुजरात, सौराष्ट्र ही शैक्षणिक सहल चालू होती. बडोदे, अहमदाबाद, नळ सरोवर, मोरवी, ठाण जं. करून आम्ही जामनगरला गेलो. तिथून द्वारकेच्या दिशेने प्रवास सुरु झाला. आमच्या दोन बसेस होत्या. ११० विद्यार्थी , ८ शिक्षकशिक्षिका आणि २ सेवक मिळून १२० व्यक्ती होत्या. सकाळी निघताना वातावरण उत्तम होतं. पुढच्या भीषण परिस्थितीची कुणालाही कल्पना नव्हती. सौराष्ट्रात चक्रीवादळे नित्याचीच असतात. ते केंव्हा कुठे उद्भवेल, केंव्हा जोर पकडेल, त्याची गती, शक्ती सगळंच अनिश्चित, अनपेक्षित असतं. जामखम्बालीयाच्या आधी एका ओढ्यावरच्या फरशीचे "गार्ड स्टोन्स" पाण्याखाली बुडालेले व वरून पाण्याचा जोरदार प्रवाह उसळून वाहात होता. अंतर २५/३० फुटांचंच होतं. पहिली गाडी पुलापलीकडे गेली - दुसरी काही अंतरावर होती. मी दुसऱ्या गाडीत होतो. वादळाचा तडाखा बसला. गाडी डगमगू लागली. या भागात वादळाची सुरुवात होऊन बराच काळ लोटला असावा. सर्वत्र पाणी भरत चाललं होतं. पावसाच्या धारा झोडपत होत्या. गाडी जामखम्बालीया बस स्थानकात शिरली. स्थानकात कोणीही नव्हतं. डोक्यावरचे पंखे मात्र जोरजोरात फिरत होते. पण ही किमया गरगरणाऱ्या चक्रवाताची होती हे नंतर कळलं. वीज केंव्हाच बंद पडली होती. पुढील प्रवास अशक्यच होता. खूप मोठा प्रलय झाला होता. सभोवती विजेच्या तुटलेल्या तारा, कोसळलेली झाडे, उडालेली छपरे, कोसळलेले खांब यांचच साम्राज्य होतं. रस्त्यांची दुर्दशा झालेली. माझा मित्र शशिकांत जुन्नरकर हा माझ्या शाळेतला एक अद्भुत व्यक्तिमत्व लाभलेला शिक्षक. इ.५ वी ते ११ वी …. नऊ ते सोळा सतरा वयोगटातले विद्यार्थी. हा आमच्या कसोटीचा प्रसंग होता. आतापर्यंत चांगलं घडलं. पुढेही चांगलंच घडणार आहे यावर सर्वांचा विश्वास. सर्वांचं मनोधैर्य उच्च प्रतीचं होतं. आम्ही जामखम्बालीयातच मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. जवळच एक शाळा दिसली. उध्वस्त झालेली. वीज नाही. तिथेच वास्तव्याला असलेल्या तीन चार शिक्षकांनी व सेवकांनी आमच्या सर्व सहलकऱ्या विद्यार्थी/ विद्यार्थिनी व शिक्षकांना आसरा दिला. तीन चार कप चहा करून दिला. श्री. जुन्नरकारांनी प्रत्येकाच्या जिभेला त्या चहाचा स्पर्श घडवला.      
गाडी ते शाळा यातलं अंतर जेमतेम ५०/६० फुटांचं होतं. गाडीच्या पायऱ्या पाण्याखाली होत्या. सर्व मैदानात पाणी होतं. वारा गरगरत होता. सर्वांच्या भेलकांड्या जात होत्या. पावलं ठरत नव्हती. ११० विद्यार्थ्यांना बसमधून उतरवून, मोठ्यांना साखळी करून एक एक पाऊल सरकवीत चालत आणि ५वी, ६वी तल्या छोट्यांना खांद्यावर घेऊन जपून शाळेपर्यंत आणायचं काम सर्व शिक्षक शिक्षिकांनी अतुलनीय धीरोदात्त वृत्तीने, मनोधैर्य ठेवून, कष्टांची तमा न बाळगता केलं. १९७५ च्या आठवणी आज २०१३ मध्येस्वतः पालक झालेल्या विद्यार्थ्यांना आजही आहेत.
विद्यार्थ्यांना खरंखुरं चक्रीवादळ अनुभवायला मिळालं. मोडलेले सिग्नल्स, आडवी झोपलेली गाडी, उध्वस्त झालेली गावं ही झाली वादळाची दृश्ये. पण विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळालं एक वेगळं जग. गुजरात, सौराष्ट्र आणि महाराष्ट्र यांच्यातला भ्रातृभाव. स्वतःचं दुःख्ख, बरंच काही गमावलेलं, संसार उध्वस्त झालेले असताना, आश्रयाला आलेल्या परांजपे विद्यालयातील ही लहानगी मुले, शिक्षक द्वारका/शिक्षिका यांचं मनोधैर्य टिकवून धरणारे तेथील बांधव. कोणत्याही प्रकारचे संभाव्य लाभ नाकारून सर्वांच्या पोटाला घास देणाऱ्या तिथल्या गृहिणी, तसेच व्यापारी, लॉजवाले, ठेलेवाले यांच्याविषयी कृतज्ञता कोणत्या शब्दांत व्यक्त करावी!
द्वारका रद्द करून जबाबदारीने वाहने चालवत आम्ही पोरबंदर गाठलं. सोरटी सोमनाथ करून वेरावळहून जुनागढ ला आलो. गिरनार, जलारामबाप्पाचं वीरपूर करून भावनगर, वाल्लभीपूर करून अहमदाबाद मार्गे मुंबईला परत आलो.  माझी नाट्यलेखिका असलेली शिक्षिका दिग्दर्शिका सौ.प्रतिभा निमकर यांनी जामखंबालियातील या वादळाच्या  प्रसंगावर लिहिलेली एकांकिका उपलब्ध आहे.
पुढे मुंबईला परतल्यावर शाळेतील विद्यार्थी/विद्यार्थिनी व सर्व शिक्षक/ शिक्षिका यांनी मिळून एक कृतज्ञता निधी उभा करून जामखम्बलीयातील त्या उध्वस्त शाळेला भेट म्हणून पाठवला. डॉ. श्री. अमृतलाल याज्ञिक यांच्या शुभहस्ते!
===================================================================